Maharashtra Election 2019 : दोन मंत्री अन् प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:50 AM2019-10-14T05:50:53+5:302019-10-14T05:57:58+5:30

राम शिंदे-रोहित पवारांत चुरशीची लढत : पिचड-कांबळे यांना पक्षांतर तारणार का? जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचे, विखेंचे की थोरांताचे? Maharashtra Election 2019

The reputation of the two ministers and the president of the state had to suffer | Maharashtra Election 2019 : दोन मंत्री अन् प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला

Maharashtra Election 2019 : दोन मंत्री अन् प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला

अहमदनगर : जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघात दुरंगी सामना रंगला आहे़ लोकसभा निवडणुकीत महायुतीने या जिल्ह्यावर कब्जा मिळविला़ विधानसभेला मात्र आघाडीने युतीसमोर आव्हान निर्माण केलेले दिसते. मंत्री राम शिंदे, पवारांचे नातू रोहित पवार, राष्टÑवादीतून पक्षांतर केलेले वैभव पिचड यांची प्रतिष्ठा जिल्ह्यात पणाला लागलेली आहे.


जिल्ह्यात गत विधानसभेला युती व आघाडी यांचे प्रत्येकी सहा आमदार विजयी झाले. यावेळी युतीकडून राधाकृष्ण विखे, त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे व पालकमंत्री राम शिंदे यांनी १२-० म्हणजे बाराही जागा युतीच्या निवडून आणू असा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजप व राष्टÑवादी प्रत्येकी आठ जागांवर, सेना चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढत आहे.


राष्टÑवादीने नेवासा मतदारसंघात उमेदवार न देता शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (संगमनेर) व भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे (शिर्डी) हे कट्टर विरोधक असल्याने ते एकमेकांच्या मतदारसंघात आव्हान निर्माण करतील असा अंदाज होता. मात्र, संगमनेर, शिर्डी या दोन्ही मतदारसंघात विरोधातील उमेदवार ऐनवेळी देण्यात आले. ते फारसे तुल्यबळ नाहीत.
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीकडून रोहित पवार हे निवडणूक लढवित आहेत़ शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणलेला आहे. मात्र, रोहित हे बारामतीची यंत्रणा घेऊन मतदारसंघात उतरले आहेत. ‘बारामतीचे पार्सल परत पाठवा’ हा भाजपने येथे प्रचाराचा मुद्दा केला आहे.


मी विकासासाठी या मतदारसंघात आलो आहे, असे उत्तर त्यावर रोहित पवार देत आहेत. राष्टÑवादीने यावेळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात प्रताप ढाकणे यांच्या माध्यमातून वंजारी समाजाला उमेदवारीची संधी दिली आहे. तर भाजपने मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे या विद्यमान आमदारांच्या रुपाने दोन महिलांना पुन्हा संधी दिली आहे. वैभव पिचड व भाऊसाहेब कांबळे या दोन आमदारांनी पक्षांतर केले आहे. त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१पवार हे नगर जिल्ह्याला कुकडी प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळू देत नाहीत. नगर जिल्ह्याचा ते केवळ राजकारणासाठी वापर करुन घेतात हा मुद्दा सेना-भाजपकडून मांडला जात आहे.
२बारामतीकर कोठे कोठे अतिक्रमण करणार? असा मुद्दा रोहित पवार यांच्या उमेदवारीबद्दल मांडला जात आहे.
३शरद पवार यांना या वयात ईडीच्या नोटिसा पाठविल्या जातात. युती सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा मुद्दा आघाडीकडून प्रचारात मांडला जात आहे.
४नगर जिल्ह्यातील शेती अडचणीत आहे. जिल्ह्याचे पाणी गोदावरीला जाते. युतीला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नाही. त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत, असाही प्रचार आघाडी करत आहे.

रंगतदार लढती
श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांच्याशी आहे. येथे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी आघाडी व युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांच्याशी आहे. येथे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी आघाडी व युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे (भाजप) व आशुतोष काळे (राष्टÑवादी) हे पारंपरिक विरोधक आमनेसामने आहेत. मात्र, येथे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे व भाजपचे विजय वहाडणे अपक्ष उमेदवारी करत आहेत.
राष्टÑवादीने अकोल्यात वैभव पिचड यांच्या विरोधात डॉ. किरण लहामटे तर पारनेरला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात निलेश लंके या नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरविले आहे. या दोन्ही मतदारसंघात चुरस दिसत आहे.
नेवासा, नगर, राहुरी, शेवगाव या मतदारसंघांतही चुरशीच्या लढती आहेत.

Web Title: The reputation of the two ministers and the president of the state had to suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.