विविध प्रश्नांसाठी आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:14 AM2021-06-27T04:14:59+5:302021-06-27T04:14:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त अनुसूचित जाती-जमाती, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.
राज्यात सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी आक्रोश निवेदने देण्यात आली होती. राजेंद्र विधाते, संतोष कानडे, देवेंद्र बहिरम, सतीश जाधव, आण्णासाहेब गायकवाड, एन. एल. गायकवाड, भाऊसाहेब कदम, ऋषीकेश आंबेकर, एम. डी. भांगरे, वि. व. गिरी, आदी उपस्थित होते.
मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील रद्द केलेले ३३ टक्के आरक्षण पूर्ववत करावे, मागासवर्गीयांची पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर अॅट्राॅसिटी व आरक्षण अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करावा, मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय मंत्र्यांची नियुक्ती करावी, देशातील कामगार विरोधी कायदे रद्द करावे, परदेशी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट रद्द करावी, नोकरीतील साडेचार लाखांचे बॅकलॉग तत्काळ भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, अशा १६ विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.
...................
२६ आरक्षण कृती समिती
आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी निदर्शने करताना राजेंद्र विधाते, संतोष कानडे, देवेंद्र बहिरम, सतीश जाधव, आण्णासाहेब गायकवाड, एन. एल. गायकवाड, भाऊसाहेब कदम, ऋषीकेश आंबेकर, एम. डी. भांगरे, वि. व. गिरी, आदी उपस्थित होते. (छायाचित्र : साजिद शेख)