रेसिडेन्सिअलच्या माजी विद्यार्थ्यांची बुथला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:17+5:302021-05-25T04:24:17+5:30

रेसिडेन्सिअल हायस्कूलमधील १९९५-१९९७ बॅचचे व्हॉट्स ॲप ग्रुपचे प्रशांत गायकवाड हे प्रमुख आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात रुग्णसेवेचे उत्तम कार्य करणाऱ्या ...

Residential alumni booth help | रेसिडेन्सिअलच्या माजी विद्यार्थ्यांची बुथला मदत

रेसिडेन्सिअलच्या माजी विद्यार्थ्यांची बुथला मदत

रेसिडेन्सिअल हायस्कूलमधील १९९५-१९९७ बॅचचे व्हॉट्स ॲप ग्रुपचे प्रशांत गायकवाड हे प्रमुख आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात रुग्णसेवेचे उत्तम कार्य करणाऱ्या बुथ हॉस्पिटलला मदत करण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी मान्यता दिली. सर्वांनी आपापल्यापरीने मदत करीत ३८ हजार २२५ रुपये जमा केले. या रकमेचा धनादेश बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रशांत गायकवाड, गोरख सांगळे, अमित इथापे, सतीश ओहोळ, प्रकाश रायकर, नीलेश म्हस्के, चंद्रकांत फसले, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जाधवर, विधिज्ज्ञ सुनील हरिश्चंद्रे, जयंत मुळे, डॉ. सचिन एकलहरे, अमोल पालवे आदी उपस्थित होते. या अमूल्य योगदनात सिडेंशिअल हायस्कूलमधील सन १९९७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच त्यांच्या इतर सहकारी मित्रांचा मोलाचा वाटा ठरला. यावेळी डॉ. काळकुंबे यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, कोणतीही गोष्ट एकीमुळेच साध्य होते. तुमची मदतही एकीचे प्रतीकच आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे माजी विद्यार्थ्यांनी कृतीमधून सिद्ध केले आहे. एकजुटीत खूप मोठी ताकद आहे. या मदतीमुळे आमचा रुग्णसेवेचा उत्साह अजून वाढला आहे.

--

फोटो- २४ रेसिडेन्सिअल स्कूल

रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचने मदतीचा धनादेश बुथ हॉस्पिटलचे डॉ. देवदान काळकुंबे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रशांत गायकवाड व माजी विद्यार्थी.

Web Title: Residential alumni booth help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.