मढी देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीचा ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:45 PM2018-01-29T18:45:05+5:302018-01-29T18:57:16+5:30
श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला.
तिसगाव : श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला.
दरम्यान विश्वस्त मंडळात काही ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे समर्थक आहेत. या सभेस ते ही हजर असल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कारभारावर तोंडसुख घेण्यात आले. तीर्थक्षेत्राचे गाव असूनही सुरु असलेली दारू विक्री, अवैध धंदे कृषी विभागासह ग्रामसेवकाची शेतकरी ग्रामस्थांना मिळत असलेली सापत्न वागणूक आदी विषयांवर सुद्धा वादळी चर्चा झाली. यावर ग्रामसेवक सरपंच व आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष विष्णूपंत मरकड यांना निरुत्तर व्हावे लागले. या गदारोळातच देवस्थान विश्वस्त मंडळासह ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मंडळ ही बरखास्त करावे असा सार्वत्रिक घोषा सुरु होता. तेव्हा ग्रामसेवक दिलीप मिसाळ यांनी या ठरावाला विरोध दर्शविला. डॉ. रमाकांत मडकर यांनी हस्तक्षेप करीत असा ठराव ग्रामसभा करू शकते, असे ठणकावले. त्यानंतर दोन्ही ठरावाला आवाजी पद्धतीने उपस्थितांनी मान्यता दिली. आपेश्वर मंदिर जागा क्षेत्रफळाची नोंद ग्रामपंचायतीचे दप्तरी करावी, अशी सूचना सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब मरकड यांनी केली. तर देवस्थानवर प्रशासक असतानाचे काळात किती कामे झाली. त्यांचा दर्जा व खर्चाची माहीती पुढे यावी. सभेस किती ग्रामपंचायत सदस्य आहेत. उपसरपंच कुठे आहेत. आजची ग्रामसभा कोण चालवतोय, असी बोचरी टीका देवस्थानच्या विश्वस्थ ज्योतीताई मरकड यांनी केली. त्यामुळे गदारोळात पुन्हा भर पडली. सीताराम माळी फिरोज शेख, भारत मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, शिवाजी मरकड, एकनाथ मरकड, माजी सरपंच देविदास मरकड आदींनी थेट मार्मिक विषयाला हात घातल्याने खडाजंगी होत राहिली. आमचे वस्तीवर लाईट नाही. पाणी नाही. मग स्थानिक कर कसे मागता? असा सवाल निकिता मरकड यांनी केला.
देवस्थान विश्वस्थ मंडळाचा मनमानी कारभार सुरु आहे.त्यांच्यात ताळमेळ नसल्याच्या तक्रारी ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडल्या.देवस्थान हे प्रथम ग्रामस्थांचे आहे.पण तेथूनच ग्रामपंचायत व ग्रामस्थात अफवा गैरसमज पसरविले जातात.त्यामुळे एकोपा रहात नाही.व विकासही होत नाही.त्यातुन देवस्थान व ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ बरखास्तीची एकमुखी मागणी झाली.व ठराव पारीत झाले.
-रखमाबाई मरकड, सरपंच.
पदाच्या हव्यासापोटी मागील विश्वस्थ मंडळात डॉ. रमाकांत मडकर यांनी कोणाचाच ताळमेळ बसू दिला नाही. काहीच जमेना म्हणून त्यांनी मे २०१४ रोजी देवस्थान विश्वस्थ मंडळ बरखास्तीचा ठराव ग्रामसभेत होण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे प्रशासक नेमणेकामी ही तीच मानसिकता होती. त्यामुळे मागील प्रशासकीय काळात विश्वस्थ मंडळाने जे गैरव्यवहार केले. त्याची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही व्हावी.
-ज्योतीताई मरकड, कार्यरत विश्वस्त.