गावोगावी साहित्य संमेलन होण्यासाठी ठराव मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:57+5:302021-05-31T04:16:57+5:30
पारनेर : गावागावात खूप साहित्यिक आहेत. मात्र, त्यांचे साहित्य सर्वत्र पोहोचत नाही. ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात साहित्य संमेलन ...
पारनेर : गावागावात खूप साहित्यिक आहेत. मात्र, त्यांचे साहित्य सर्वत्र पोहोचत नाही. ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात साहित्य संमेलन होण्यासाठी आपण ठराव मांडणार असल्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य दिनेश औटी यांनी सांगितले.
पारनेर येथील मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक दिनेश औटी यांची राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर पारनेर येथील नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी नागेश्वर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिनेश बडवे होते.
दिनेश औटी म्हणाले, राज्यातील साहित्य मंडळावर निवड होणे हा पारनेरकरांचा सन्मान आहे. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर साहित्यिक, लेखक आहेत. त्यांचे साहित्य खूप दर्जेदार असते. मात्र, त्यांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
दिनेश बडवे म्हणाले, संत तुकाराम पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून दिनेश औटी यांनी साहित्यिकांना बळ दिले. पारनेरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून साहित्य चळवळ रुजविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.
यावेळी देवीदास वैद्य, प्रमोद गोळे, डॉ. नरेंद्र मुळे, कल्याण थोरात, सतीश म्हस्के, राजेंद्र म्हस्के, रामदास पठारे, रामदास काळे, हर्षवर्धन औटी, रायभान औटी आदी उपस्थित होते.
----
३० दिनेश औटी
पारनेर येथील साहित्यिक दिनेश औटी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर नागेश्वर मित्रमंडळाचे प्रमुख डॉ. नरेंद्र मुळे, दिनेश बडवे, प्रमोद गोळे, कल्याण थोरात, राजेंद्र म्हस्के, सतीश म्हस्के, रामदास काळे, हर्षवर्धन औटी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.