बिनविरोधच्या फॅक्टरमुळे सहकारी सोसायट्यांचे ठराववाले कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:41+5:302021-02-13T04:19:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी प्रतिनिधी म्हणून माजी ...

Resolutions of co-operative societies in a coma due to unopposed factor | बिनविरोधच्या फॅक्टरमुळे सहकारी सोसायट्यांचे ठराववाले कोमात

बिनविरोधच्या फॅक्टरमुळे सहकारी सोसायट्यांचे ठराववाले कोमात

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी प्रतिनिधी म्हणून माजी आमदार राहुल जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यासाठी अर्थकारणाची गणिते केलेले सहकारी सोसायटींचे ठराववाले कोमात गेले आहेत.

जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत दत्तात्रय पानसरे व प्रेमराज भोयटे यांच्यात लढत झाली. यावेळी सर्व ठराववाल्यांची चांदी झाली होती. या निवडणुकीतही राहुल व दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत होईल यावर लाखोंची गणिते करून स्वत:चा ठराव करून घेण्यासाठी सोसायटी संचालकांचे खिसे भरून खूश केले आहे होते, पण दत्तात्रय पानसरे यांना या प्रवर्गात उमेदवारी अर्ज भरला नाही. यामुळे सोसायटी मतदारसंघातील मतांचा निर्देशांक कोसळला. पाचपुते गटाकडून वैभव पाचपुते अगर प्रवीण कुरुमकर यापैकी एकाचा अर्ज राहील, असे गणित केले. त्यासाठी १६९ ठराववाल्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते.

पण राजकीय डावपेचात कुरुमकर व पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि राहुल जगताप हे बिनविरोध झाले. अनुराधा नागवडे याही महिला प्रवर्गातून बिनविरोध झाल्या. त्यामुळे ठराववाले कोमात गेले असून, श्रीगोंद्याच्या आखाड्यात शांतता झाली आहे.

....

मोजक्या घराण्याकडे बँकेच्या चाव्या

सहा घराण्यांभोवती बँकेचे राजकारण

जिल्हा बँक स्थापनेपासून श्रीगोंद्यात खासेराव वाबळे, शिवाजीराव नागवडे, शिवाजीराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, प्रेमराज भोयटे, दत्तात्रय पानसरे यांच्याभोवती बँकेचे राजकारण आणि अर्थकारण फिरले आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांनी बँकेत प्रेमराज भोयटे, शिवाजीराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, दत्तात्रय पानसरे यांना संचालक करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. मात्र स्वत:ला जिल्हा बँकेत एन्ट्री करता आली नाही. तरी बबनराव पाचपुते ३५ वर्षे आमदारकीची सत्ता ताब्यात ठेवण्याचा इतिहास घडविला आहे. आता त्याच घराण्यांकडे बँकेच्या चाव्या गेल्या आहेत. बँकेतील गटबाजी व अर्थकारणाची फोडणी बसणार आणि याचा भडका २०१४च्या विधानसभा निवडणुकीत होणार निश्चित आहे.

...

Web Title: Resolutions of co-operative societies in a coma due to unopposed factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.