ज्येष्ठांचा आदर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:56 AM2019-09-23T11:56:30+5:302019-09-23T11:56:53+5:30

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ येतो.

Respect the senior | ज्येष्ठांचा आदर करा

ज्येष्ठांचा आदर करा

सन्मतीवाणी
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ येतो. घरात वडीलधारी माणसे हवीत. त्यांचा परिवाराला आधार असतो. ज्येष्ठ वेळोवेळी आपल्याला चांगला सल्ला व सूचना देतात. जे ज्येष्ठांचा आदर करतात ते भावी आयुष्यात यशस्वी होतात. ज्येष्ठांचा कधीही अनादर करू नका. 
ज्येष्ठांची सेवा करा. निश्चितच फळ मिळेल. महावीरांनी स्वत: तपस्या केली पण फळ मात्र इतरांना मिळाले. बीज एक असते पण फळ सगळ्यांना मिळतात. मातेने दिलेले आशीर्वाद शुुभंकर असतात. त्यांनी मातेचा शब्द पाळला. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा मातेला दिलेला शब्द        पाळला. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मुलांनी केला पाहिजे. ममतेपासून दूर राहून कठोर तपस्या करणे सोपे नाही. मृत्युचा महोत्सव बनविण्याची ताकद महापुरुषांमध्ये असते. तुमच्या चेहºयावर हास्य असेल तर समोरच्या व्यक्तीलाही हसावेच लागते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास निरंतर चालू असतो. आई-वडिलांविषयी कृतज्ञतेची भावना ठेवावी. दिवसभर तुम्ही तुमच्या व्यवसायात, नोकरीत, उद्योगात व्यस्त रहा पण रात्री झोपण्याच्या आधी आई वडिलांशी प्रेमाने बोला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा. त्यांना सुखद अनुभव येईल. त्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. जीवन जगताना सजग रहा म्हणजे शेवटचा काळ आनंदित जाईल. ज्येष्ठांचा आदर करण्याचे फळ चांगलेच मिळते यावर विश्वास ठेवा.
- पू. श्री.सन्मती महाराज

Web Title: Respect the senior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.