पोखरणा ज्वेलर्सच्या ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:21+5:302021-05-16T04:20:21+5:30

अहमदनगर : येथील ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या १६ व्या वर्धापन दिनाचे व अक्षय तृतीयेचे औचित्य साधून ग्राहकांना २२ कॅरेट ...

Response to online purchase of Pokhrana Jewelers | पोखरणा ज्वेलर्सच्या ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद

पोखरणा ज्वेलर्सच्या ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद

अहमदनगर : येथील ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या १६ व्या वर्धापन दिनाचे व अक्षय तृतीयेचे औचित्य साधून ग्राहकांना २२ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदीवर मजुरीत २० टक्के सवलत दिली. २४ कॅरेट सोन्याची नाणी व वेढणीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना लॉकडाऊननंतर दुकान उघडल्यानंतर दागिने दिले जातील, अशी माहिती अमित पोखरणा व आकाश पोखरणा यांनी दिली.

दीड दशकांची विश्वसनीयता व शुद्धतेची परंपरा असलेल्या ए.एच. पोखरणा ज्वेलर्सला ग्राहकांनी भरभरून प्रेम दिले आहे. राज्यातील ग्राहकही मनपसंत दागिने खरेदीसाठी या दालनात येतात. मुहूर्ताची खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदा अक्षय तृतीयेचा मुहूर्त असताना लॉकडाऊन चालू आहे. मात्र, ग्राहकांना मुहूर्तावर त्यांच्या मनपसंत खरेदीचा आनंद मिळवून देण्यासाठी ऑनलाइन खरेदीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांनीही घरबसल्या सुरक्षित वातावरणात सुवर्ण खरेदी केली. २२ कॅरेट हॉलमार्क प्रमाणित दागिने व मोठी व्हरायटी आणि सर्वात कमी मजुरी दर पोखरणा ज्वेलर्सचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ग्राहक दागिने खरेदीसाठी ग्राहक आवर्जून दालनात येतात. ऑनलाइन दागिने खरेदीच्या योजनेलाही ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद हे आमच्या विश्वसनीयतेचे प्रतीक आहे, असे पोखरणा यांनी सांगितले. सध्या लग्नसराई चालू आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन खरेदीची संधी मिळाल्याने ग्राहकांनी सुवर्ण बस्त्याचीही खरेदी केली, असे पोखरणा यांनी सांगितले. (वा. प्र.)

फोटो- १४ पोखरणा फोटो

Web Title: Response to online purchase of Pokhrana Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.