कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला शेवगावात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:18+5:302021-03-27T04:22:18+5:30
शेवगाव : कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला शेवगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून ...
शेवगाव : कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला शेवगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. महाविकास आघाडीमधील घटकपक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनी बंदला पाठिंबा दिला होता.
सकाळी साडेअकराच्या सुमारास मोर्चा काढून क्रांती चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, भाकपचे संजय नांगरे, बापू राशिनकर, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बब्रू वडघने, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, राष्ट्रवादीचे वाहाब शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष कमलेश लांडगे, समीर शेख, शेख, महिलाध्यक्षा कल्पना खंडागळे, निजाम पटेल, सेवादल अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, समीर काझी, पांडुरंग नाबदे, दशरथ धावणे, रवी लांडे, विलास निकाळजे, आसिफ काझी आदी उपस्थित होते.
--
२६ शेवगाव मोर्चा
शेवगाव येथे कृषी कायद्याविरोधात शुक्रवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.