कर्जत-जामखेडची जबाबदारी माझ्यावर : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:58 PM2018-11-01T14:58:50+5:302018-11-01T14:59:05+5:30

कर्जत-जामखेड मतदारसंघाची विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोपवा.

Responsible for Karjat-Jamkhed: Ajit Pawar | कर्जत-जामखेडची जबाबदारी माझ्यावर : अजित पवार

कर्जत-जामखेडची जबाबदारी माझ्यावर : अजित पवार

राशीन : कर्जत-जामखेड मतदारसंघाची विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोपवा. बारामतीसारखा विकासाचा अनुशेष भरून दाखवतो, असे म्हणत या मतदारसंघाला दिलेला उमेदवार योग्यच असेल,अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे दिली.
चिलवडी (ता.कर्जत) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी राजेभोसले अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी सरकार दुष्काळ सदृश स्थिती असल्याचे सांगते. त्यांना शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे देणे-घेणे नाही. शेतकºयांसाठी कर्जमाफीची फसवी घोषणा केली. धनगर समाजाला आम्हीच देऊ केलेल्या आरक्षणाचे या सरकारने भिजत घोंगडे ठेवले, असे म्हणत पवारांनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला.
धनदांडग्यांचे हे सरकार आहे. देशाचा चौकीदार म्हणविणारे मोदी कोट्यवधी रूपयांचा चुना लावणारे विजय मल्ल्या, निरव मोदी यांना अभय देणारे आहे. गोरगरिबांसाठी लबाडाघरचे आवतन असणारे फसवे सरकार असल्याने जनतेने यावेळेला युती सरकारला घरी बसवावे. येत्या विधानसभेला युतीचे सरकार पाडण्यासाठी सर्वांनी आता जोखीम उचलण्याची वेळ आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, बाळासाहेब साळुंके, अ‍ॅड. कैलास शेवाळे, शाहू राजेभोसले, शहाजी राजेभोसले आदी उपस्थित होते.
आमच्यात मेळ नाही म्हणून दुसरा आमदार
पालकमंत्री राम शिंदे मतदारसंघात उद्घाटन करण्यात व्यस्त आहेत. मतदारसंघात रस्त्याची दुरवस्था आहे. कर्जतच्या एसटी आगाराची फसवी घोषणा करीत ते जनतेला फसवित आहेत. दादा, व्यासपीठावरील आमच्या लोकांमध्ये मेळ नसल्याने दुसरा आमदार होत आहे. त्यामुळे आपण स्वत: या भागाचे प्रतिनिधीत्व करावे, अशी कर्जतकरांची अपेक्षा असल्याचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड म्हणाले.
निवडणुका आल्या की राम मंदिर आठवते
च्जनतेच्या भावनांना हात घालणारे हे सरकार आहे. निवडणुका जवळ आल्या की, प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधण्याची त्यांना आठवण होते. मुंबईत महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना उध्दव ठाकरेंना वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, त्यांनी राम मंदिर बांधण्याची वल्गना करू नये, असा टोलाही अजित पवारांनी मारला.

Web Title: Responsible for Karjat-Jamkhed: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.