डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:26+5:302021-02-18T04:35:26+5:30

कोपरगाव : कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने जनतेसाठी मोफत सुरु केलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केले आहे. यामुळे ...

Restart the Dedicated Covid Center | डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा

डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा

कोपरगाव : कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने जनतेसाठी मोफत सुरु केलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केले आहे. यामुळे अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर त्वरित सुरु करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव तालुक्यातील सुविधा, उपचार, तपासणी बंद केल्याने अनेक नागरिक या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात उपचारासाठी जात असल्याचे आजही निदर्शनास येत आहे. भविष्यात रुग्णांची संख्येत वाढ झाल्यास नागरिक आक्रमक भूमिका घेतील. यात कोणी कठोर पाऊले उचलू नये, यासाठी बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करुन एकाच छताखाली उपचार व तपासणी सुरु करावी. जेणे करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. देशभरात लस सुरु झालेली असली, तरी अद्याप ती घराघरात गेलेली नाही, त्यात काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते.

दुसऱ्या टप्प्यातील लाट ही जीवघेणी राहील कोरोनाची रुग्णांची संख्या कमी झाली. संकट अद्यापही कमी झालेेले नसताना देखील नागरिकांचे सोय सुविधांसाठी असलेले डेडिकेटड कोविड सेटंर बंद केल्याचे जाहीर झाल्याने अनेकांची तपासणीपासून ते उपचारापर्यंत सर्वच गैरसोय होत आहे. सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची मोफत होत होती. परंतु, आता याच तपासणीला नागरिकांना खासगी ठिकाणी पैसे माजावे लागत आहे. असेही कोल्हे म्हणाल्या.

Web Title: Restart the Dedicated Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.