लोकसहभागातून होणार ज्ञान मंदिरांचा जिर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:58+5:302021-02-18T04:36:58+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच स्नेहमेळावा पार पडला. विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी ७५ लाखाचा खर्च अपेक्षीत ...
श्रीगोंदा : तालुक्यातील मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच स्नेहमेळावा पार पडला. विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी ७५ लाखाचा खर्च अपेक्षीत असून रयत शिक्षण संस्थेने १५ लाखाचा धनादेश दिला. माजी विद्यार्थ्यांनी सात लाखाचा निधी जमा केला. उर्वरित निधी जमा करून लोकसहभागातून ज्ञान मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला.
माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ६ लाख ७७ हजार २५५ रूपये दिले. यामध्ये १९९५ च्या बॅचमधील वर्गमित्र वैभव इथापे व दत्तात्रय झिटे यांनी १ लाख ५१ हजाराचा निधी जमा केला. संजय भोसले यांनी ५० हजार, विठाई पतसंस्था ११ हजार, जयदीप मांडे यांनी तीन वर्गखोल्यांची फरशी बसवून देण्याचे जाहीर केले. उमाकांत राऊत यांनी सर्व खोल्यांचे लाईट फिटिंग, विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व सेवक व कर्मचारी यांनी मिळून १ लाख २१ हजार,
मॅनेजिंग काउंसिल सदस्य बाबासाहेब भोस, तुकाराम कन्हेरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला १५ लाखाचा निधी सहाय्यक अधिकारी शिवाजी तापकीर यांनी मुख्याध्यापक नवनाथ बोडखे यांच्याकडे जमा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर रसाळ होते. यावेळी सरपंच महानंदा मांडे, रवींद्र महाडिक, जिजाबापू शिंदे, सुभाष शिंदे, संग्राम शिंदे, नंदिनी वाबळे, संतोष गुंड, बाळासाहेब नलगे, बापूसाहेब वाबळे, स्मितल वाबळे उपस्थित होते. प्रा. फुलसिंग मांडे यांनी आभार मानले.
फोटो : १७ मढेवडगाव
मढेवडगाव येथील शाळेच्या इमारत बांधकामासाठी लोकसहभाग जमा करण्यात आला.