नगरमधील निर्बंध १५ मेपर्यंत वाढवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:58+5:302021-05-11T04:20:58+5:30
अहमदनगर : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरमधील निर्बंध येत्या १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शंकर गोरे ...
अहमदनगर : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरमधील निर्बंध येत्या १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सोमवारी हा आदेश जारी केला. पुढील पाच दिवस महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने दिनांक ३ ते १० मे या काळात कडक निर्बंध लागू केले होते. त्यांची मुदत मध्यरात्री संपणार होती. कडक निर्बंध लागू केल्याने रुग्णसंख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख वाढत असल्याने कडक निर्बंधांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरमध्ये रविवारी ४२१ नवे रुग्ण आढळले होते. सोमवारी हा आकडा पुन्हा वाढला असून, नव्याने ५९४ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नगर शहरात आढळले आहेत. शहरातील ४ हजार ८३ रुग्ण उपचार घेत असून, गंभीर रुग्णांची संख्या २९१ इतकी आहे. मागील आठवड्यात ही संख्या ७००हून अधिक होती.
...
दहा दिवसांतील रुग्णसंख्या
१ मे - ८१७
२ मे - ५६६
३ मे - ४२६
४ मे - ६२२
५ मे - ७६६
६ मे - ६७४
७ मे - ७३२
८ मे - ४४२
९ मे - ४२१
१० मे - ५९४
....
काय सुरू राहणार...
औषध दुकाने
अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोलपंप नियमित वेळेत
घरपोच गॅस सेवा
सर्व बँका
दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सकाळी ७ ते ११
पशुखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
....
हे राहणार बंद
किराणा दुकाने
भाजीपाला व फळ बाजारातील मालाची खरेदी-विक्री
अंडी, मटण, चिकन व मासे विक्री