राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:32+5:302021-04-14T04:18:32+5:30

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील काळेगाव येथील आदिनाथ सातपुते यांच्या संस्कृत संस्कृती संवर्धन संघाच्या माध्यमातून गेल्या मार्च महिन्यात १५ ते ...

Results of state level online Sanskrit competition announced | राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत स्पर्धेचा निकाल जाहीर

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील काळेगाव येथील आदिनाथ सातपुते यांच्या संस्कृत संस्कृती संवर्धन संघाच्या माध्यमातून गेल्या मार्च महिन्यात १५ ते ३० तारखेदरम्यान 'शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण' ही राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा निकाल ११ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांतील व परदेशातील वेगवेगळ्या वयोगटातील असे एकूण ३८१ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांचे प्रथम, द्वितीय व तृतीय असे प्रत्येकी दोन क्रमांक काढण्यात आले आहेत. प्रथम गोपाळ पणशीकर व रुद्राणी देशमानकर प्रथम, ज्ञानीन देशपांडे, अमरजा गोखले यांनी द्वितीय, मधुरा चिंचमलातपुरे, श्रीनिधी बीडकर यांनी तृतीय क्रमाक मिळवला. द्वितीय गटातून वाल्मिक कुलकर्णी व अथर्व ताम्हनकर प्रथम क्रमांक मिळवला. श्रीहरी अभ्यंकर व तनिषा सावे द्वितीय, तर जान्हवी दांडेकर व तीर्था खराबे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

तृतीय गटातून श्रीयश कुलकर्णी व ओजस्विन् कोल्हटकर प्रथम क्रमांक मिळवला. श्रावणी पाठक व निशीता साखरदांडे द्वितीय, तर संजीवनी सुतार व यज्ञदा जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. चतुर्थ गटातून डॉ. वैशाली गोस्वामी व विजयकुमार कमळापुरकर प्रथम, ओम दांडेकर व सपना शेरेकर द्वितीय, देवकी खोत व गौरी बापट यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धेचे परीक्षण संस्कृत भाषेतील तज्ज्ञ मंडळींनी केले असल्याची माहिती आयोजक आदिनाथ सातपुते यांनी दिली.

Web Title: Results of state level online Sanskrit competition announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.