नेवाशात पाच फेऱ्यांमध्ये जाहीर होणार निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:23+5:302021-01-18T04:19:23+5:30
नेवासा : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानामागील शासकीय गोडावून येथे होत आहे. ग्रामपंचायतीची मतमोजणी आणि निकाल ...
नेवासा : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानामागील शासकीय गोडावून येथे होत आहे. ग्रामपंचायतीची मतमोजणी आणि निकाल एकाचवेळी जाहीर होणार आहे. १३ टेबलवर पाच फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होईल.
सोनई गावची मतमोजणी प्रभाग फेरीनुसार सकाळी आठपासून सुरू होणार आहे.
विनाकारण गर्दी व गोंधळ करू नये, असे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी सोमवारी होत आहे. नेवासा फाट्यावरील शासकीय गोदामांच्या ठिकाणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. १३ टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार आहे. सोनई ग्रामपंचायतीची मतमोजणी मात्र प्रभागानुसार होणार आहे.
भालगाव, बहीरवाडी, बाभुळखेडा, म्हाळस पिंपळगाव, नारायणवाडी, बऱ्हाणपूर, मोरगव्हाण, गोणेगाव, चांदगाव, कारेगाव, गळनिंब, पुनतगाव या गावाची मतमोजणी सकाळी आठ वाजता पहिल्या फेरीत होणार आहे. सकाळी नऊ वाजता दुसऱ्या फेरीत उस्थळखालसा, शिंगवे तुकाई, सुरेगाव, दिघी, पाचुंदा, निपाणी निमगाव, मक्तापूर, नजिकचिंचोली, टोका, जळके बुद्रूक, बकूपिंपळगाव, खेडले या गावांची मतमोजणी होणार आहे. तिसऱ्या फेरीत दहा वाजता बेल्हेकरवाडी, तरवडी, वरखेड, जळके खुर्द, भेंडा बुद्रूक, मुरमे, सलाबतपूर, गोंडेगाव, खडका, निंभारी, लांडेवाडी, रामडोह या गावची मतमोजणी सुरू होईल.
गेवराई, पिंप्रीशहाली, चांदा, रांजणगाव, बेलपिंपळगाव, देवगाव, कुकाणा, वाकडी, लोहगाव, घोगरगाव, तेलकुडगाव, प्रवरासंगम या ग्रामपंचायतींची मतमोजणी चौथ्या फेरीत होईल तर जेऊर हैबती, उस्थळ, सलाबतपूर ही गावे पाचवी फेरीपर्यंत चालतील.