निळवंडे धरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:17+5:302021-04-11T04:20:17+5:30

निळवंडे डाव्या कालव्याच्या कामाविरोधात काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने स्थगिती उठवल्यामुळे कुंभेफळ येथे बंद असलेले कालव्याचे ...

Resumption of work on Nilwande Dam | निळवंडे धरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात

निळवंडे धरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात

निळवंडे डाव्या कालव्याच्या कामाविरोधात काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने स्थगिती उठवल्यामुळे कुंभेफळ येथे बंद असलेले कालव्याचे काम डाॅ. मंगरूळे यांच्या मध्यस्थीने सुरू झाले आहे. निंब्रळ, मेहेंदुरी, खानापूर, रेडे येथेही प्रांताधिकारी यांच्या मध्यस्थीला यश आले आहे.

तालुक्यातील कुंभेफळ येथील सीताराम कोंडाजी कोटकर, सदाशिव कोंडाजी कोटकर, किसन रामचंद्र कोटकर या शेतकऱ्यांची एकूण ८ एकर जमीन आहे. त्यातील ३ एकर जमीन ही निळवंडे कालव्यात जाते. कालवे खोदाईचे क्षेत्र पाहता शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची भीती आहे. जमीन शिल्लक राहत नाही, त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरुद्ध जलसंपदा कालवे विभागदेखिल न्यायालयात गेला होता. गुरुवारी न्यायालयाने सदर शेतकऱ्यांना दिलेली स्टे ऑर्डर रद्द केली. त्यामुळे शुक्रवारी कालवे खोदाईच्या कामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन मोजून देण्याची मागणी केली. त्या कोरोना सावट कमी झाल्यावर जमीन मोजून देवू, असे प्रांताधिकारी यांनी सांगितले.

कालवे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने, पोलीस निरीक्षक अभय परमार, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, कुलकर्णी, तलाठी प्रमोद शिंदे उपस्थित होते.

तालुक्यात निंब्रळ येथील वाळके वस्ती, मेहेंदुरी फाट्याजवळ आरोटे वस्ती, खानापूर येथील ठाकरवाडी जवळ, रेडे येथे तसेच कुंभेफळ येथे कालवे खोदाईवरून वाद सुरू होता. या आठवड्यात तेथे जाऊन संबंधित मूळ शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या समजून घेतला, त्यावर मार्ग काढला. शेतकऱ्यांच्या सहकार्याने कामे सुरू झाली. अकोले तालुक्यातील डाव्या कालव्याच्या निळवंडे धरण ते कळस खुर्द या अकोले तालुक्यात काम सुरू आहे. जेथे कोणतेही खोदाईची कामे सुरू झाली नव्हते.

१० अकोले

Web Title: Resumption of work on Nilwande Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.