उद्योगपतींच्या कंपन्यांपुढे किरकोळ व्यापारी जगला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:12+5:302020-12-23T04:17:12+5:30
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात रविवारी (दि. २०) उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळावा ...
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात रविवारी (दि. २०) उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक सुधीर डागा यांनी केले.
कोयटे म्हणाले, पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणेच भारत देशात मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांचा भांडाफोड आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीने करत आहोत. यामुळे ग्राहकांची फसवणूक करून, फसव्या जाहिराती देऊन, छोटे-मोठे किराणा दुकानदार, व्यापारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अशाप्रकारे होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्र शासनाने कायदा करून तो लवकरात लवकर अमलात आणावा म्हणजे, सामान्य नागरिक हा प्रामाणिकपणे जीवन जगेल आणि व्यापारी, दुकानदार प्रामाणिकपणे सेवा देतील. लोकल ते व्होकलप्रमाणे आत्मनिर्भर भारत अंतर्गत आम्हाला न्याय द्यावा, असेही कोयटे म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, रिटेल व्यापारी संघटनेचे सचिव सचिन निवगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक कैलास ठोळे, केशव भवर, नरेंद्र कुर्लेकर, कोपरगाव महिला महासंघाच्या किरण डागा, किरण दगडे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले.
.............
कोपरगाव येथे उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटनांच्या मेळाव्यात दीपप्रज्वलन करताना श्याम जाजू, समवेत काका कोयटे, कैलास ठोळे.
.......
फोटो२२- व्यापारी मेळावा- कोपरगाव