निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक जमा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:16+5:302021-08-29T04:22:16+5:30
खर्डा : जिल्हा परिषद प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा हप्ता तातडीने जमा करावा, अशी मागणी जिल्हा ...
खर्डा : जिल्हा परिषद प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा हप्ता तातडीने जमा करावा, अशी मागणी जिल्हा पेन्शनर संघटना (प्राथमिक शिक्षक) यांच्याकडून करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळालेला नाही. मात्र, इतर कर्मचाऱ्यांना हा फरक मिळालेला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाचा आदेश असूनही सेवानिवृत्तांना सातव्या वेतन आयोगाचा फरक का जमा करण्यात आला नाही, याची चौकशी व्हावी व यात विलंब होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाई करावी, अशी मागणी जिल्हा कार्यकारिणीचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बन्सी उबाळे, दशरथ ठुबे, शशिकांत इथापे, रमाकांत सांगळे, पोपटराव पवार, भाऊसाहेब ढेरे, ज्ञानेश्वर थोरात, दिगंबर थोरात, पोपट भुते, मोहनसिंग परदेशी, अशोक महामुनी, मोतीलाल विभुते, श्रीराम मोरे, दगडू बोराडे आदींनी केली आहे.