दारुविक्रीला सहाय्य ठरणारा रस्ता हस्तांतरणाचा ठराव मागे घ्या
By Admin | Published: May 15, 2017 02:09 PM2017-05-15T14:09:16+5:302017-05-15T14:09:16+5:30
दारूची दुकाने पुन्हा सुरु करण्यासाठी नगरपंचायतीने रस्ता हस्तांतरणाचा दिलेला प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे़
आॅनलाईन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ १५ - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शहरातील राज्यमार्गालगतची दारूची दुकाने बंद झाली़ मात्र, हीच दुकाने पुन्हा सुरु करण्यासाठी नगरपंचायतीने रस्ता हस्तांतरणाचा दिलेला प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे़
राज्यमार्गालगतची दारुविक्री बंद झाल्यानंतर रस्त्यावरील तळीरामांची संख्या चांगलीच रोडावल्यामुळे अकोले शहरात शांतता व विकासाचे वातावरण तयार होण्यास मदत होत आहे. नगरपंचायतीने पूर्वी शहर हद्दीतील राज्यमार्गाचा भाग नगरपंचायतकडे वर्ग करावा, अशी विनंती करणारा ठराव करून तो सार्वजिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. रस्ता अशा प्रकारे नगरपंचायतकडे हस्तांतरित झाल्यास रस्त्याच्या या भागाचा ‘राज्यमार्ग’ हा दर्जा संपुष्ठात येईल. याचा फायदा उठवित बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरु होणार होतील. शहरात पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण होईल़ त्यामुळे दारूची दुकाने पुन्हा सुरु होण्यास सहाय्यभूत ठरणारा रस्ता हस्तांतरणाचा ठराव नगरपंचायतने मागे घ्यावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केले आहे. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशाराही माकपचे डॉ. अजित नवले व कार्यकर्त्यांनी दिला आहे़