श्रीगोंदा तालुक्यातून पाच हजार मजुरांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:14 PM2020-05-17T20:14:08+5:302020-05-17T20:14:18+5:30
श्रीगोंदा : पर जिल्हा व परप्रांतीय मजुरांचे लोंढे घराकडे पायी निघाले होते. या भयभीत झालेल्या जीवांना सहारा दिला आणि श्रीगोंदा तालुक्यातील ६ हजार ४०० मजूर व विद्यार्थ्यांपैकी ५ हजार १६८ मजुरांना रेल्वे, बस व खाजगी बसमधून घरपोहच करण्यात आले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून घरवापसीची ही मोहीम फत्ते केली. यासाठी पोलिस, आरोग्य व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष सहकार्य केले आहे.
बाळासाहेब काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क

तहसीलदार महेंद्र माळी यांनी परप्रांतीय मजुरांची घरवापसीसाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन केला. नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, मंडलाधिकारी प्रशांत कांबळे यांच्यासह लिपिक व तलाठी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मजुरांचे स्थलांतर परवाने तयार करून वाहनांची व्यवस्था केली. त्यांना जेवण, फूड पॉकेट आणि पाण्याची व्यवस्था केली. त्यांना बसमध्ये बसवून देईपर्यत दक्षता घेण्याचे धोरण घेतले.
---
श्रीगोंद्यातून यवतमाळ -२३६८, वाशिम-५०७, हिंगोली-१५६, अकोला -१२३, नांदेड -१३८, उत्तर प्रदेश-७५२, मध्यप्रदेश-३८४, छत्तीसगड- ३४३ अशा मजुरांना सुखरुप पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय कामासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी परवाने दिले. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली. आॅनलाईन पध्दतीने काही नागरिकांना स्थलांतर परवाने दिले.
--
पुणे जिल्ह्यातून हिरडगावमध्ये एक जावई, त्यांची दोन मुले हे दोन महिन्यांपासून हिरडगावमध्ये लॉकडाउनच्या लालफितीत सापडले होते. तहसीलदार यांच्याकडे अर्ज करताच एक तासात स्थलांतर परवाना दिला. मजूर स्थलांतराबाबत प्रशासकीय यंत्रणेने सामाजिक जाणीवेतून काम केले.
-मिलिंद दरेकर, हिरडगाव
---------------
श्रीगोंद्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे पालन केले. त्यामुळे कोरोनाची तालुक्यात एन्ट्री झाली नाही. श्रीगोंद्यात अडकलेल्या मजुरांना घरपोहच करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मेहनत घ्यावी लागली. पण ते नागरिक त्यांच्या घरी पोहचले, यात आनंद आहे.
-महेंद्र महाजन, तहसीलदार
-----------
फोटो- १७ श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील मजुरांची त्यांच्या प्रांतात घरवापसी करण्यात आली. यावेळी त्यांची बसमध्ये व्यवस्था करताना प्रशासनातील अधिकारी.