३९०० कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल : कुकडी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:40 PM2018-09-08T15:40:26+5:302018-09-08T15:40:29+5:30
सात तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील रखडलेले मुख्य कालवे, चाºयांची कामे तसेच भूसंपादनापोटी शेतकºयांचे थकलेले पैसे देण्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ३ हजार ९०० कोटी खर्चाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : सात तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील रखडलेले मुख्य कालवे, चाºयांची कामे तसेच भूसंपादनापोटी शेतकºयांचे थकलेले पैसे देण्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ३ हजार ९०० कोटी खर्चाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच कुकडी प्रकल्पाचे भाग्य उजळणार आहे.
या अहवालात डिंबे-येडगाव कालवा अस्तरीकरण व विस्तारीकरण, तुकाई चारी, चौंडी चारी यांचा समावेश आहे. मात्र डिंभे माणिकडोह बोगद्याचा समावेश नाही. श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा तालुक्यातील अर्धवट सर्व कामांचा यात समावेश आहे. धरणांचे गेट व वॉल भराव दुरूस्ती तसेच कार्यालयीन इमारती तसेच नारायणगाव, कोळवडी व श्रीगोंदा येथील विभागीय विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा समावेश आहे. या धरणांवर लहान मोठे नऊ कालवे आहेत. या कालव्यांद्वारे आंबेगाव, जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा या तालुक्यातील सुमारे १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पण गेटची मोडतोड, कालवा व चाºयांना अस्तरीकरण नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती वाढली होती. त्यामुळे सिंचन आवर्तनावर गंभीर परिणाम झाला होता. अर्धवट
कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीअभावी ही कामे १५वर्षांपासून रेंगाळली होती.
पालकमंत्री राम शिंदे यांनी कुकडी प्रकल्पातील सिंचनातील अडचणीचा अभ्यास करून या प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागास दिल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल तयार झाला आहे. यामुळे कुकडी प्रकल्पातील रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कुकडी प्रकल्प शेतकºयांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सुधारित प्रकल्प अहवाल प्रलंबित असल्याने कुकडीची काही कामे अर्धवट राहिल्यामुळे सिंचनावर परिणाम झाला होता. सुधारित प्रकल्प अहवाल मंजूर झाला की अर्धवट कामे व भूसंपादनाची कामे मार्गी लावता येतील. - प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्पाची एकूण क्षमता - ३७ टी एम सी
उपयुक्त क्षमता ३१ टी एम सी
वाया जाणारे पाणी ७ टी एम सी
एकूण सिंचन क्षेत्र १लाख ५६हजार २७८हेक्टर
प्रत्यक्षात सिंचन क्षेत्र १लाख ३२हजार, ५६६हेक्टर
एकूण कालवे ९,
एकूण लांबी ६२३ किमी
डावा कालवा २४९किमी