नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:28 AM2019-07-13T10:28:30+5:302019-07-13T10:29:01+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुकवारी (१२ जुलै) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुकवारी (१२ जुलै) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. सुरक्षा जाळ्या तुटून मोठे मोठे दगड महामार्गावर येऊन पडल्याने
नाशिककडे जाणारा रस्ता बंद आहे. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली असून दरड हटविण्याचे काम शनिवारी सकाळी सुरू आहे.
सिन्नर ते खेड असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरूंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी झिरपत असून अनेक मोठे मोठे दगड सुट्टे झाले आहेत. दगड सुट्टे झाल्याने या जाळ्यांवर ताण पडत आहे. शुक्रवारी रात्री मोठे मोठे दगड खाली येवून महामार्गावर पडले. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. लाखो रुपये खर्चून सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.