मुळा धरणाचा उजवा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:32 PM2018-09-15T15:32:39+5:302018-09-15T15:32:45+5:30

उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाचा उजवा कालवा शुक्रवारी बंद करण्यात आला आहे़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठ्याचा वापर करण्यात आला आहे़

Right canal closure of radha dam | मुळा धरणाचा उजवा कालवा बंद

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाचा उजवा कालवा शुक्रवारी बंद करण्यात आला आहे़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठ्याचा वापर करण्यात आला आहे़ पाणलोट व लाभक्षेत्रावर पाऊस थांबल्याने शेतकरी हतबल झाला असून सर्वांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार ४५३ क्युसेकने श्ोतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू होते़ एका बाजूला दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू होते़ सध्या मात्र धरण पाणलोटात १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याशिवाय धरण लाभक्षेत्रात दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने आवर्तन ऐन पावसाळ्यात सुरू करण्यास पाटबंधारे खात्याला भाग पाडले.
पाणलोट क्षेत्रावर पाऊस थांबल्याने धरणाच्या पाण्याची पातळी घटू लागली आहे़ गणेश उत्साहात पाऊस हजेरी लावील, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती़ मात्र पावसाने अंगठा दाखविल्याने धरणातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. 
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १९ हजार ६४७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.  मुळा धरण ७६ टक्के भरले आहे़ धरणात उपयुक्त पाण्याचा साठा १५ हजार ६४७ दशलक्ष घनफूट इतका आहे़ कोतूळ येथे २९९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर येथे ३३३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.  त्यामुळे शेतकरी वर्ष अडचणीत आले आहेत़

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४४ दिवस शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ मुळा धरणाच्या पाण्याची पातळी खाली जात आहे़ धरणात ७६ टक्के पाण्याचा साठा आहे़ ७० टक्के पाणी साठा उपयुक्त आहे़ उन्हाळयात आवर्तनाची गरज भासणार आहे़
भविष्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे़ वरिष्ठांच्या आदेशानुसार उजवा कालवा बंद करण्यात आला आहे़ डावा कालवा गेल्या आठवड्यात बंद करण्यात आलेला आहे.- -अण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता, मुळा धरण.

Web Title: Right canal closure of radha dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.