मुळा धरणाचा उजवा कालवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:21+5:302021-02-22T04:14:21+5:30
राहुरी : मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष ...
राहुरी : मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २० हजार ९४१ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणाचा उजवा कालवा ३८ दिवस चालला. गेल्या ३८ दिवसात उजव्या कालव्याखालील ऊस, कांदा, हरभरा ,गहू ,फळबाग, चारा पिके ओलिताखाली आले आहेत. डावा कालवा यापूर्वीच बंद झाला आहे. डावा कालवा १९ दिवस चालला होता. डाव्या कालव्यात खाली तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणातून रब्बी पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.
....
आणखी दोन आर्वतन मिळणार
मुळा धरणातून शेतकऱ्यांना रब्बीसाठी आणखी दोन आवर्तन मुळा धरणातून मिळणार आहेत. उन्हाळी पाण्याचे आवर्तन २८ फेब्रुवारीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
....
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन भरणे झाल्यामुळे बंद करण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वापरण्यात आला आहे. ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
-अण्णासाहेब आंधळे,
मुळा धरण, अभियंता.