मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 03:23 PM2021-02-21T15:23:27+5:302021-02-21T15:24:11+5:30

मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

Right canal of Mula dam closed, cycle lasted for 38 days | मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन

राहुरी : मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २० हजार ९४१ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 

मुळा धरणाचा उजवा कालवा ३८ दिवस चालला.  गेल्या ३८ दिवसात उजव्या कालव्याखालील ऊस, कांदा, हरभरा ,गहू ,फळबाग, चारा पिके ओलिताखाली आले आहेत. डावा कालवा यापूर्वीच बंद झाला आहे. डावा कालवा १९ दिवस चालला होता. डाव्या कालव्यात खाली तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणातून रब्बी पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.

 

Web Title: Right canal of Mula dam closed, cycle lasted for 38 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.