मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:21+5:302021-04-14T04:18:21+5:30
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात खाली उन्हाळी पहिले आवर्तन सुरू झाले. आवर्तनामध्ये ऊस, कांदे, घास, मका, फळबाग यांना दिलासा मिळाला ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात खाली उन्हाळी पहिले आवर्तन सुरू झाले.
आवर्तनामध्ये ऊस, कांदे, घास, मका, फळबाग यांना दिलासा मिळाला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आत्तापर्यंत तीन हजार ८१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा शेतीसाठी वापर झाला आहे. डाव्या कालव्यातून ५०८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून, डावा कालवा यापूर्वीच बंद झाला आहे. सलग तीन वर्षे मुळा धरण भरले होते. त्यामुळे तीनही वर्षे शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाले.
मुळा धरणातून बाष्पीभवन पिण्यासाठी व कारखान्यासाठी जाऊन साधारण सात हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्याचे हे पहिले उन्हाळी आवर्तन होते. दुसरे मे महिन्यात लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा पुरेशा प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे.
.....
मुळा धरणात सध्या १५ हजार ८१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीसाठी उन्हाळ्याचे दुसरे आवर्तन मे महिन्यात मिळणार आहे. उजव्या कालव्याखाली भरणे संपल्यानंतर, उजवा कालवा बंद करण्यात येणार आहे.
- सायली पाटील,
कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर