ॠषी कपूर यांच्या निधनाने शनिशिंगणापुरात रसिकांनी व्यक्त केली हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 01:57 PM2020-04-30T13:57:01+5:302020-04-30T13:57:13+5:30
नेवासा : चित्रपट कलावंत ॠषी कपूर यांनी सन २००३ मध्ये शनिशिंगणापुरला पहिल्यांदा भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले.या दर्शनातून त्यांना आत्मीय समाधान मिळाल्याने नंतर ते वर्षातून एकदा शनिदर्शनासाठी आवर्जून ये असत.
नेवासा : चित्रपट कलावंत ॠषी कपूर यांनी सन २००३ मध्ये शनिशिंगणापुरला पहिल्यांदा भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले.या दर्शनातून त्यांना आत्मीय समाधान मिळाल्याने नंतर ते वर्षातून एकदा शनिदर्शनासाठी आवर्जून ये असत.
शनिशिंगणापुरला २००३ मध्ये ॠषी कपूर पहिल्यांदा आले होते.तत्कालीन देवस्थान अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर यांनी त्यांचा सत्कार केला होता.त्यावेळचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्याकडे त्यांनी घरांना दरवाजे व कडीकुलप नसलेली घरे पहायची असे म्हटल्यानंतर त्यांना गावातील घरे दाखविण्यात आली.माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर यांच्या घरी त्यांनी चहा घेतला तर राजेंद्र जोंधळे यांच्या घरी जेवणाचा अस्वाद घेतला होता.
सोनई येथील जगदंबादेवीचा नवरात्र उत्सव सुरु असून आज त्या ठिकाणी बालगोपाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचे विनायक दरंदले यांनी त्यांना सांगताच ॠषी कपूर यांनी शिर्डीला जाताने जगदंबादेवी सोहळ्यास भेट देवून चिमुकल्यांचे कौतुक केले होते. येथे उत्सव कमेटी अध्यक्ष विश्वासराव गडाख यांनी त्यांचा सत्कार केला होता.शनिशिंगणापुर व सोनई येथील चाहते या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
-----------
नेवासा- दिवंगत सिने कलावंत ॠषी कपूर शनिदर्शन अटोपून जनसंपर्क कार्यालयाकडे जाताना.त्यांच्या समावेत पत्रकार विनायक दरंदले व राजेंद्र जोधळे दिसत आहेत.