शिर्डीत रस्सीखेच : लोखंडे, कानडे, वाकचौरे, घोलप चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:16 PM2019-03-14T17:16:28+5:302019-03-14T17:16:36+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज महत्वपूर्ण बैैठक आयोजित करण्यात आली.
श्रीरामपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज महत्वपूर्ण बैैठक आयोजित करण्यात आली. यात संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिर्डीतील सेनेचा उमेदवार जाहीर होणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे हे मातोश्रीवर रवाना झाले आहेत. खासदार सदाशिव लोखंडे हेदेखील मुंबईत तळ ठोकून आहेत. नगरसाठी २३ एप्रिल रोजी तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी अवधी शिल्लक राहिला आहे. शिर्डीतून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खासदार सदाशिव लोखंडे, साहित्यिक लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजीमंत्री बबनराव घोलप यांची नावे चर्चेत आहेत.
वाढत्या वयोमानामुळे कारकीदीर्तील ही अखेरचीच निवडणूक असल्याने वाकचौरे तयारीला लागले आहेत. सेनेकडून डावलले गेल्यास त्यांनी यापूर्वीच अपक्ष उमेदवारी करण्याचीही तयारी दर्शविली होती. लहू कानडे हेदेखील ऐनवेळी सेनेच्या बैैठकांना उपस्थित राहिले. मागील खेपेला श्रीरामपुरातून त्यांनी सेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून अलिप्त झाले होते. शुक्रवारी अथवा शनिवारी उमेदवारांची घोषणा होईल.