कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:40+5:302021-01-01T04:15:40+5:30
अहमदनगर : भाव घसरल्याने गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे गुरुवारी झालेल्या लिलावात भाव हजार ते दीड ...
अहमदनगर : भाव घसरल्याने गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे गुरुवारी झालेल्या लिलावात भाव हजार ते दीड हजार रुपयांनी वाढून ३७०० पर्यंत गेले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी (१४ डिसेंबर) कांद्याला चार हजारांचा भाव होता. त्यामुळे १७ डिसेंबरच्या लिलावात विक्रमी १ लाख १२ हजार कांदा गोण्यांची आवक झाली; परंतु एवढी आवक झाल्याने चार हजारांवरील भाव अडीच हजारांपर्यंत खाली आले. त्यानंतरच्या लिलावात दोन ते अडीच हजारांपर्यंतच भाव राहिला. भाव पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी, पंधरा दिवसांपूर्वीची १ लाखांवरील कांदा गोण्यांची आवक घसरून ३० ते ३५ हजारांपर्यंत खाली आली.
दरम्यान, गुरुवारी नगर बाजार समितीत २८ हजार ४५४ (१५ हजार ६४९ क्विंटल) कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला २८५० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव निघाला.
----------
गुरुवारचे कांदा भाव
प्रथम प्रतवारी २८५० ते ३७००
द्वितीय प्रतवारी १८०० ते २८५०
तृतीय प्रतवारी ९०० ते १८००
चतुर्थ प्रतवारी ५०० ते ९००