भूतकरवाडी येथे रस्ता काॅंक्रिटीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:41+5:302021-06-30T04:14:41+5:30
अहमदनगर : बालिकाश्रम रोड-भूतकरवाडी परिसरातील श्री कॉलनी येथे नगरसेविका वंदना ताठे यांच्या प्रयत्नांतून अंतर्गत रस्ता काॅंक्रिटीकरण व बंद पाईप ...
अहमदनगर : बालिकाश्रम रोड-भूतकरवाडी परिसरातील श्री कॉलनी येथे नगरसेविका वंदना ताठे यांच्या प्रयत्नांतून अंतर्गत रस्ता काॅंक्रिटीकरण व बंद पाईप गटार कामाचा प्रारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, सभापती रवींद्र बारस्कर, विलास ताठे, ईश्वर तोडमल, राजू तोडमल, माधुरी देशपांडे, अनुप धोडपकर, संजय जोशी, निलेश शिंदे, पीयूष कुलथे, ईश्वर पडोळे, हर्षल शिंदे, भगवान देशपांडे, सचिन पाठक, राजेंद्र सुपेकर आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, प्रत्येक प्रभागांमध्ये विकासात्मक प्रश्न सोडविले जात आहेत. अनेक वर्षांपासूनची ड्रेनेज लाईन जीर्ण झाली होती. उघड्या गटारींनी स्वच्छता व दुर्गंधीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत होता. तर चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होती. याची दखल घेत रस्ता काॅंक्रिटीकरण व बंद पाईप गटारीचे काम मार्गी लावले.