मायगाव देवीतील रस्ता पुरामुळे गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:36 AM2019-09-14T11:36:57+5:302019-09-14T11:44:45+5:30
कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई माता मंदिराकडे जाण्यासाठी असलेला रस्ता आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे.
धामोरी :कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई माता मंदिराकडे जाण्यासाठी असलेला रस्ता आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. सुमारे ५०० मीटर रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे.
येत्या काही दिवसांवर नवरात्र उत्सव आला आहे. नवरात्र उत्सव काळात भाविकांची येथे मोठी वर्दळ वाढणार आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भाविक व परिसरातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. अंबाबाई माता मंदिराची शासनाच्या देवस्थान यादीमध्ये समावेश आहे. मात्र, हा रस्ता दीड महिन्यापासून दुर्लक्षित राहिल्याने नाराजीचे वातावरण आहे. नवरात्र काळामध्ये येथे दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. सध्या रस्त्यामुळे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरूस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.