नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:52 AM2018-08-09T11:52:10+5:302018-08-09T11:52:21+5:30
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनानिमित्त नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यात नेवासा शहर, भेंडा, कुकाणा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे.
नेवासा : मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनानिमित्त नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यात नेवासा शहर, भेंडा, कुकाणा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे.
तालुक्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने बसस्थानक आणि रस्त्यांवर ही वाहने नसल्याने शुकशुकाट आहे. पेट्रोलपंप ही ओस पडले आहत. शाळा, महाविद्यालय ही बंद ठेवण्यात आले आहेत. नेवासा शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळून शहरातील गणपती मंदिर चौकात चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. तालुक्यातील भेंडा, कुकाणा येथे ही बंद पाळून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. नेवासा फाटा, देवगड फाटा, प्रवरासंगम,भानसहिवरा, वडाळा, घोडेगाव, सोनई या प्रमुख गावांसह इतर गावांमध्ये सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शनी शिंगणापूर येथे भाविकांचा दर्शनासाठी ही ओघ कमी आहे. तालुक्यात सर्वत्र शांततेत आंदोलन सुरू आहे.