उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:55 PM2017-11-10T17:55:01+5:302017-11-10T17:58:27+5:30

यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Road Stop at Rahuri to get the price of sugarcane @ 3400 rupees | उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार गणेश तळेकर व पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखाने सुरू झाले असून साखर कारखान्यांनी सर्वाधिक भाव देऊ असे सांगून शेतक-यांची दिशाभूल केली आहे़शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता साखर कारखान्यांनी भाव जाहीर करावा अन्यथा कारखाने बद पाडू, असा इशारा राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला.
प्रकाश देठे म्हणाले, ऊस उत्पादनावरील खर्च वाढला असून कमीतकमी भावात ऊस लाटण्याचा कारखानदारीचा उद्योग आहे. शासन व कारखानदाराने बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा देठे यांनी दिला. यावेळी देवेंद्र लांबे, संदीप खुरूद, ज्ञानेश्वर क्षिरसागर, दिनेश वराळे, अरूण डौले, सुनिल इंगळे यांची भाषणे झाली. आंदोलनात सतीश पवार, सचिन म्हसे, भाऊसाहेब गटकळ, विजय तोडमले, संदीप शिरसाट, विजय तोडमल, काका राजदेव, किशोर वराळे आदी उपस्थित होते.

Web Title: Road Stop at Rahuri to get the price of sugarcane @ 3400 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.