रस्ते झाले ओसाड, तर दवाखाने हाऊस फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:54+5:302021-04-11T04:20:54+5:30
शेवगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तसेच लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. कोरोनाने शिरकाव केल्यापासून ते ...
शेवगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तसेच लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
कोरोनाने शिरकाव केल्यापासून ते आजतागायत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४ हजार २४९ वर पोहचली आहे. दरम्यान गत तीन दिवसात २६२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन समोरील चिंता अधिक वाढल्या आहेत. त्यात पोलीस, महसूल, नगरपरिषद आदीसह प्रशासनातील फ्रंटलाईन वर्कर म्हणून सेवा बजावणारे बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना आजाराने ग्रासले आहे. अपुरे मनुष्यबळ व वाढत्या रुग्णसंख्येचा भार प्रशासनावर पडला असून कोरोना काळातील प्रतिबंधक उपाययोजना करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊन दरम्यान बाजारपेठ, बसस्थानक, विविध कार्यालये, बाजार समिती, एरव्ही गजबजलेल्या चौकात शुकशुकाट पहायला मिळाला.
रस्त्यावरुन तुरळक वाहने धावताना दिसून येते होती. तर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी कोरोना चाचणी व लसीकरण करुन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते.
.............
तालुक्यातील ३२७ कोरोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत असल्याचे तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील विखे आयुर्वेद कॉलेज, त्रिमूर्ती कॉलेज येथे कोरोना केअर सेंटर लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. - अर्चना पागिरे, तहसीलदार
१० शेवगाव