श्रीगोंदा-कर्जत तालुक्यातील नऊ गुन्ह्यातील दरोडेखोरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 04:24 PM2020-09-20T16:24:12+5:302020-09-20T16:34:34+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा-कर्जत तालुक्यातील जबरी चोरी,घरफोडी दरोडा यासारख्या नऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश देवराम गायकवाड रा भिंगाण ता श्रीगोंदा या दरोडेखोरास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.,या संदर्भात पोलिस उपाधीक्षक संजय सातव व दौलतराव जाधव पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
श्रीगोंदा : श्रीगोंदा-कर्जत तालुक्यातील जबरी चोरी,घरफोडी दरोडा यासारख्या नऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश देवराम गायकवाड (रा भिंगाण ता .श्रीगोंदा ) या दरोडेखोरास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलिस उपाधीक्षक संजय सातव व दौलतराव जाधव पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पोलिसांनी ८५हजार रुपयांचा 18 ग्राम वजनाचा नेकलेस 85 हजार रुपयांचे 17.760 ग्राम वजनाचे मिनी गठण,50 हजार रुपये किमतीचे 10 ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे वेल 15 हजार रुपये किमतीचे 3 ग्राम वजनाचे सोन्याचे वेल तसेच 25 हजार रुपये किमतीचे 5.3 ग्राम वजनाचे सोन्याची चैन व बदाम, श्रीगोंदा शहरानजीक असणाऱ्या भोळेवस्ती या ठिकाणी झालेल्या चोरीमध्ये 25 हजार रुपये किमतीचे 5 ग्राम वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीची 5 ग्राम वजनाची सोन्याची पोतमाळ, 5 हजार रुपये किमतीचे 1 ग्राम वजनाची सोन्याची नथ, तालुक्यातील वडाळी येथे झालेल्या चोरीत 20 हजार रुपये किमतीचे 3.5ग्राम वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र 20 हजार रुपये किमतीचे 4 ग्राम वजनाचे सोन्याचे टॉप्स 25 हजार रुपये किमतीचे 5 ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील वेल, तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील भन्हाळी या ठिकाणी झालेल्या जबरी चोरीमध्ये 50 हजार रुपये किमतीचे 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र , 20 हजार रुपये किमतीचे 4 ग्राम वजनाची सोन्याची चैन, तालुक्यातील मांडवगण या ठिकाणी झालेल्या चोरीत 15 हजार रुपये किमतीचे 3 ग्राम वजनाची सोन्याची पोतमाळ तसेच भानगाव येथील चोरीमध्ये 3 हजार किंमतीचे 1 ग्राम सोन्याची नथ तसेच सुरोडी येथून 30 हजार किमतीची दुचाकी, कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथून 30 हजार रुपयांची दुचाकी, श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई फाटा नजीक झालेल्या चोरीमध्ये 15 हजार रुपये किमतीचे 3 ग्राम वजनाचे मनिमंगळसूत्र 10 हजार रुपये किमतिचा चोरीचा मोबाईल तसेच 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण तब्बल 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये श्रीगोंदा पोलिसांकडून 3 जबरी चोरी 4 घरफोडी व दोन मोटारसायकल चोरी असा एकूण 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार अप्पर अधीक्षक सागर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, संजय काळे,गोकुळ इंगवले,योगेश सुपेकर, प्रताप देवकाते,प्रशांत राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता
भानगाव शिवारात लपविले सोने
सुरेश गायकवाड दिपक गायकवाड हे पितापुत्रास डी पी व इलेक्ट्रीकल मोटारी मोटारसायकली चोरणारे चोर पण काही दिवसापासून पिता पुत्रांनी घरफोडी कडे मोर्चा वळविला आणि सुसाट सुटला तो जंगलात राहत होता भानगाव शिवारातील बापू गोलांडे यांच्या कडे आठ दिवसापासून सालकरी गडी म्हणून चोरीचा माल शेतातील घरातील घरात लपून ठेवला पोलिसांनी पर्दाफाश केला