मौजमजेसाठी लूटमार करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:37+5:302021-01-13T04:50:37+5:30

अक्षय भीमा गाडे (वय २३, रा. मुदगल वाडा, शिवाजीनगर, नगर), विश्वास नामदेव गायकवाड (वय २१, रा. एमआयडीसी, नगर), नीलेश ...

Robbery gang jailed for fun | मौजमजेसाठी लूटमार करणारी टोळी जेरबंद

मौजमजेसाठी लूटमार करणारी टोळी जेरबंद

अक्षय भीमा गाडे (वय २३, रा. मुदगल वाडा, शिवाजीनगर, नगर), विश्वास नामदेव गायकवाड (वय २१, रा. एमआयडीसी, नगर), नीलेश बाळासाहेब कार्ले (वय २२, रा. वडगावगुप्ता), नीलेश संजय शिंदे (वय २१, रा. तांबटकरमळा, नगर) व अमोल बाबुराव कणसे (वय २५, रा. बोल्हेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीने ८ जानेवारी रोजी निंबळक ते केडगाव बायपासदरम्यान दोघा ट्रकचालकांना अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम चोरून नेली होती. याचदरम्यान एका कारचालकाचीही लूटमार केली होती. तसेच ८ जानेवारी रोजी रात्री शहरातील पाईपलाईन रोडवरील प्रियदर्शनी हॉटेलजवळ याच टोळीने पायी जाणाऱ्या दोघा तरुणांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व दोन मोबाईल हिसकावून नेले होते. यातील एक गुन्हा एमआयडीसी पोलीस स्थानकात, तर तीन गुन्हे तोफखाना पोलीस स्थानकात दाखल झाले होते. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना स्थानकाचे उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेडकॉन्स्टेबल जपे, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धीरज अभंग, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीश वरटे, धीरज खंडागळे, महेश दाताळ, साबीर शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

व्यसनांसाठी करायचे लूट

व्यसन, हाॅटेलमधील जेवण व इतर मौजमजा करण्यासाठी हे पाच जण लूटमार करत होते. लुटलेले पैसे ते मौजमजा करण्यातच उडवत होते. या आरोपींनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत, याचाही तपास गुन्हे प्रगटीकरण शोखेचे उपनिरीक्षक समाधान सोळंके व त्यांची टीम करत आहे.

फोटो ११ आरोपी

ओळी- नगर शहर व परिसरात लूटमार करणाऱ्या टोळीला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.

Web Title: Robbery gang jailed for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.