महात्मा फुले योजनेत हॉस्पिटलकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:55+5:302021-04-11T04:19:55+5:30

जामखेड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजिनाथ डोके यांच्या पत्नीला १९ मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा ...

Robbery from hospital in Mahatma Phule scheme | महात्मा फुले योजनेत हॉस्पिटलकडून लूट

महात्मा फुले योजनेत हॉस्पिटलकडून लूट

जामखेड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजिनाथ डोके यांच्या पत्नीला १९ मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देता येईल. त्यासाठी डोके यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतले. यानंतर सिझर करावे लागेल, एक रुपयाही खर्च येणार नाही असे सांगितले. मात्र फाईल प्रोसेसिंगसाठी पाच हजार रुपये डोके यांना भरण्यास सांगितले. त्यानुसार डोके यांनी पाच हजार भरले व नंतर डॉक्टरांनी सिझर केले.

सिझर केल्यावर जन्मलेल्या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम भरले असताना काचेत आयसीयूमध्ये ठेवावे लागेल असे सांगून गरज नसताना बाळाला आयसीयूमध्ये तीन ते चार दिवस ठेवले. कुठलाही उपचार केला नाही तसेच इतर खर्च म्हणून पंधरा हजार रुपये भरुन घेतले.

वेगवेगळ्या खर्चापोटी २३ हजार रुपये भरून घेतले. याबाबत तक्रारदार संभाजी डोके यांनी सदर रूग्णालयाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अहमदनगर येथील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्याधिकारी यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली. हा सर्व प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांना सांगितले. मंगेश आजबे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे सदर हाॅस्पिटलचा तक्रारींचा पाढा वाचला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

( हॉस्पिटलचा कोट आवश्यक )

Web Title: Robbery from hospital in Mahatma Phule scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.