स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:34+5:302021-08-29T04:22:34+5:30
झारखंड राज्यातील राजकुमार कारू साव (वय २४) हा पारगाव सुद्रिक येथे पोकलेन चालक म्हणून काम करत होता. त्याला राजू ...
झारखंड राज्यातील राजकुमार कारू साव (वय २४) हा पारगाव सुद्रिक येथे पोकलेन चालक म्हणून काम करत होता. त्याला राजू नामक व्यक्तीने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून विसापूर येथील उखलगाव रोडवरील रेल्वे पुलाजवळ बोलावले. त्यानुसार राजकुमार साव हा शुक्रवारी (दि. २७) ठरलेल्या ठिकाणी आला असता ऊस व निमोणीच्या बागेत लपून बसलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळीने दगड व काठीने मारहाण करून त्याच्याजवळील १ लाख २० हजारांची रक्कम घेऊन पसार झाले. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी फिर्यादीस संशयित गुन्हेगारांचे फोटो दाखवून आरोपींची शोधमोहीम सुरू केली.
पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, ज्ञानेश्वर पठारे, गोमसाळे, नंदकुमार पठारे, कैलास शिपनकर, सोनवणे, महिला कर्मचारी अविदा जाधव यांनी सापळा रचून सुरेगाव व कोळगाव शिवारातून सात आरोपींना दोन तासांत जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींमध्ये शभ्या कुंज्या चव्हाण (वय २८), घड्याळ्या हिरामण चव्हाण (वय ५०), रेबीना घड्याळ्या चव्हाण (वय ४५), ओंकार कुंज्या चव्हाण (वय २०, सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५, रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर), बबुशा चिंगळ्या काळे (वय १९, रा. वांगदरी) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.