प्रजासत्ताक दिनी आकाशात झेपावणार रॉकेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:10+5:302021-01-16T04:23:10+5:30
डांगे म्हणाले, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यादिवशी शाळेतील मुलांनी बनवलेली १०० रॉकेट एकाचवेळी या कॅम्पसमधून आकाशात ...
डांगे म्हणाले, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यादिवशी शाळेतील मुलांनी बनवलेली १०० रॉकेट एकाचवेळी या कॅम्पसमधून आकाशात झेपावणार आहेत. सातवी ते बारावीपर्यंतच्या पाचशे मुला- मुलींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. एका गटामध्ये तीन मुले असणार आहेत. तसेच परिसरातील शाळेतील संशोधनाची आवड असणाऱ्या मुलांनादेखील यात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे अशा मुलांनीदेखील संधीचा लाभ घ्यावा. तसेच २६ जानेवारीला ग्रामस्थांनी या रॉकेट लॉन्चिंगच्यावेळी उपस्थित राहावे.
शास्त्रज्ञ धनेश बोरा म्हणाले, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत संशोधनाची वृत्ती जागृत व्हावी, मुलांनी संशोधनाकडे वळावे, यासाठी इस्रो प्रयोग राबवत असते. त्या माध्यमातून प्रत्येक मुलांपर्यंत सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी ज्यामध्ये यांत्रिक सायन्स, आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी मुलांपर्यंत पुरवल्या जातात. याच कोर्सच्या माध्यमातून इंद्रभान डांगे प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून या शाळेतील मुलांना विशेष परवानगी घेऊन रॉकेट सॅटेलाइट, इंटर प्यानेटील रोवर, दुर्बिण आदी आधुनिक टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी मुलांची ८ दिवस कार्यशाळा घेतली जाणार आहे. २८ फेब्रुवारीला मुलांनी बनविलेली १०० रॉकेट संकुलातील कॅम्पसमधून लॉन्च करण्याचा मानस आहे. यावेळी प्राचार्य गणेश डांगे, स्नेहलता डांगे, पूनम डांगे, शिवाजी देवडे, गणेश शार्दुल, जालिंदर धनवटे, सचिन गीते व शिक्षक उपस्थित होते.
............
१७ हजार फुटांवर झेपावणार रॉकेट...
या रॉकेटला ‘कॉलर सॅटेलाइट लँड वेहिकल’ असे नाव आहे. सी-२५ मॉडेल असून, जमिनीपासून १७ हजार फुटांवर किंवा सरळ फायर होते. त्याची पाच किमीपर्यंत रेंज आहे. त्यानंतर पॅराशुटमार्फत या ठिकाणाहून हे उड्डाण केले, त्याच ठिकाणी खाली येते. हे मोबाईलच्या वाय-फायनेसुद्धा ऑपरेट होऊ शकते. तसेच खाली येताना पृथ्वीची वेगवेगळी निरीक्षणे, नयनरम्य दृश्ये टिपू शकते. यासाठी त्यामध्ये स्पाय कॅमेरा बसवला जातो.
..................
फोटो१५- डांगे