'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय'

By महेश गलांडे | Published: October 24, 2020 12:16 PM2020-10-24T12:16:01+5:302020-10-24T12:21:04+5:30

आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे.

Rohit Pawar did business in Karjat-Jamkhed without socializing, says ram shinde | 'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय'

'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय'

ठळक मुद्देआमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे.

मुंबई - भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी समाजकारण केले असून धंदा केलाय, असा घणाघाती टोला शिंदेंनी लगावला. मी केलेल्या कामांचं भूमीपूजन मंत्र्यांचे हस्ते झाले असतानाही, ते पुन्हा एकदा त्याच कामांचे भूमीपूजन करत आहेत. कोंबड्याची पिल्ल, मासे, आणि बियाणं इथं विकून ते धंदा करत आहेत, समाजकारण नाही, असा आरोप शिंदे यांनी केलाय. 

आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे. मात्र, भाजपा नेते राम शिंदेंनी रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका केलीय. रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्ल, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही तर धंदा केलाय. मासे, कोंबड्याची पिल्लं आणि बियाणं इथं आणून ते विकतात. त्यामुळे, समाजकारण नाही तर धंदा करण्यासाठीच ते इथं आलेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे ते बोलत होते. 

रोहित पवारांनी तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली आहेत. बारामती पॅटर्न सपशेल फोल ठरला असून लोकांची घोर निराशा झालीय, नव पर्व... वगैरे काहीही नसून सगळं खोट असल्याचंही शिंदे यांनी म्हटले. 
 
खडसेंच्या प्रवेशावर राष्ट्रवादीला टोला

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडला, असे म्हटले आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावेळी एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते, ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीने या घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदारच फोडल्याची टीका शिंदे यांनी केलीय.  

Web Title: Rohit Pawar did business in Karjat-Jamkhed without socializing, says ram shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.