पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:16+5:302021-08-01T04:21:16+5:30

जामखेड/कर्जत : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार सरसावले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील ...

Rohit Pawar rushed to help the flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले रोहित पवार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले रोहित पवार

जामखेड/कर्जत :

अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार सरसावले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिक आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक दोन लाख वस्तूंचे वाटप केले. सहा ट्रकच्या माध्यमातून ही मदत पाठविण्यात आली.

कोरोनाच्या संकटकाळातही राज्यात कोविड योद्धांसाठी आणि नागरिकांसाठी आमदार रोहित पवार यांनी हजारो लिटर सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिजन काॅन्सट्रेटर, गॉगल, धान्य, भाजीपाला, इतर वैद्यकीय उपकरणे, औषधे आदी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरग्रस्तांसाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पुराच्या पाण्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून चादर, बिस्किट, सॅनिटरी नॅपकिन्स, पाण्याच्या बॉटल, एनर्जी ड्रिंक, क्लोरीन पावडर, मास्क, नूडल्स, माचीस आदी वस्तूंचा समावेश असलेले दोन लाखाहून अधिक साहित्य त्यांनी पोहोच केले. या साहित्याचे गरजू नागरिकांना न्याय्य वाटप व्हावे, यासाठी ते संबंधित ठिकाणचे तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले. याशिवाय मदत व बचावकार्य करत असताना काही अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेट्यांचाही या मदत साहित्यात समावेश करण्यात आला आहे.

यावेळी आमदार रोहित पवार यांच्या समवेत कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, सचिन मांडगे, सुधीर जगताप, सचिन लाळगे, विलास धांडे, दीपक यादव आदी मदतीसाठी पथकात सहभागी झाले होते.

----

३१ रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी कोकणवासीयांना जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.

Web Title: Rohit Pawar rushed to help the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.