रोहित पवार म्हणतात..कुकडीचे पाणी सुटणारच आहे, मग उपोषण कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:00 PM2020-06-01T12:00:23+5:302020-06-01T12:01:29+5:30

 जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

Rohit Pawar says..the water of the hen is about to run out, so why fast? | रोहित पवार म्हणतात..कुकडीचे पाणी सुटणारच आहे, मग उपोषण कशाला?

रोहित पवार म्हणतात..कुकडीचे पाणी सुटणारच आहे, मग उपोषण कशाला?

जामखेड :  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

   माजी मंत्री राम शिंदे हे कुकडीचे फळबागा, पिके व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे यासाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनीही शुक्रवारी सकाळीच उपोषण सुरू केले आहे. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

   यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, पिके व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुटावे यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामुळे कुकडीचे आवर्तन टेल टू हेड ६ जून रोजी सुटणार आहे. त्यामुळे मी त्यांना (माजी मंत्री राम शिंदे, बबनराव पाचपुते) कसे सांगणार? हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या मते कुकडीचे आवर्तन सुटणारच आहे. तर त्यांनी का उपोषणास बसावे. असा सवालही त्यांनी केला.  

Web Title: Rohit Pawar says..the water of the hen is about to run out, so why fast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.