महिनाभरात पाचवेळा जळाले रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:39+5:302021-07-01T04:15:39+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील तांदळी दुमाला येथील गावठाणचे रोहित्र एका महिन्यात पाच वेळा जळाले. तेव्हापासून निम्मे गाव अंधारात आहे. यामुळे ...
श्रीगोंदा : तालुक्यातील तांदळी दुमाला येथील गावठाणचे रोहित्र एका महिन्यात पाच वेळा जळाले. तेव्हापासून निम्मे गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये महावितरणबाबत प्रचंड नाराजी आहे.
तांदळी गावठाणमधील महावितरणच्या रोहित्राची क्षमता ६३ केव्ही आहे. हे रोहित्र तेरा वर्षांपूर्वी बसविलेले आहे. अलीकडे या डीपीवर काही शेतकऱ्यांनी कृषी पंप बसविले. त्यामुळे विजेचा भार वाढला. त्यामुळे हे रोहित्र वारंवार जळण्याचे सत्र सुरू झाले. महिनाभरात तब्बल पाच वेळा हे रोहित्र जळाले. यामुळे गावातील सेंट्रल बँक, सेवा सोसायटी, पिठाची गिरणी इतर व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. येथील रोहित्राची क्षमता १०० केव्ही करावी, अशी मागणी नवनाथ भोस यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत येथील रोहित्राची क्षमता न वाढविल्यास तांदळीचे ग्रामस्थ श्रीगोंदा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे भोस यांनी सांगितले.