मुळा डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:02 PM2017-12-26T18:02:11+5:302017-12-26T18:02:57+5:30

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहीती मुळा डावा कालव्याचे शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़

Roots left water for agriculture from left canal | मुळा डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडले

मुळा डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडले

ठळक मुद्दे १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहीती मुळा डावा कालव्याचे शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़. मुळा डाव्या कालव्याखाली ७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़. उद्या डाव्या कालव्यातून आवर्तन वाढवून २०० क्युसेकस करण्यात येणार आहे़. सुमारे ४५० दलघफु पाणी गरजेचे आहे़ या आवर्तनाचा गहु, हरभरा, उस, चारा पिकांसह इतर पिकांना लाभ होणार आहे़.
डाव्या कालव्यातुन रब्बीसाठी एक आवर्तन मिळणार आहे़. याशिवाय उन्हाळी हंगामात तीन पाणी शेतीसाठी मिळणार आहे़. यंदा मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही़, त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याखालील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे़. डाव्या कालव्याचे आवर्तन २२ दिवस चालण्याची शक्यता आहे़. मुळा धरणाचा उजवा कालवा २० डिसेंबर रोजी सोडण्यात आला आहे़. दोन्ही कालवे आवर्तन सुरू असल्याने शेतक-यांची लगबग वाढली आहे़. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २४ हजार ३९० दलघफु पाणीसाठा असल्याची माहीती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़.
 

 

Web Title: Roots left water for agriculture from left canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.