केलवड येथील शेतक-याने फिरवला सोयाबीनवर रोटाव्हेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:41 PM2019-09-18T13:41:46+5:302019-09-18T13:44:26+5:30
राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्राच्या गावामध्ये सोयाबीन, बाजरी व इतर खरीप पिके अंतिम स्थितीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या केलवड गावातील शेतक-याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. नानासाहेब धोंडीबा फटांगरे यांनी आपल्या दीड एकर सोयाबीन पिकात सोमवारी रोटाव्हेटर चालवला.
अस्तगाव : राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्राच्या गावामध्ये सोयाबीन, बाजरी व इतर खरीप पिके अंतिम स्थितीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या केलवड गावातील शेतक-याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. नानासाहेब धोंडीबा फटांगरे यांनी आपल्या दीड एकर सोयाबीन पिकात सोमवारी रोटाव्हेटर चालवला. सोयाबीन व बाजरी या पिकांमध्ये ऐन धान्य भरण्याच्या वेळी आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी दिली. थोडासा पाऊस झाला. मात्र पिकांमध्ये धान्य भरलेच नाही. त्यामुळे संपप्त झालेले फटांगरे यांनी भर सोयाबीन पिकात रोटाव्हेटर चालवला. २५ हजार रुपयांचा त्यांना पिकाच्या मशागतीसाठी खर्च आला होता. राहाता तालुक्यातील केलवड, आडगाव, पिंपरी-निर्मळ, खडकेवाके, पिंपरी- लोकाई, गोगलगाव, को-हाळे, डो-हाळे तसेच वाळकी ही सतत दुष्काळाच्या छायेत असलेली गावे आहेत. खरिपाची पिके गेल्याने पीकविमा मंजूर करण्यासह राज्य सरकारचे अनुदान,शैक्षणिक फी मध्ये सवलत यांसह इतर मदत करावी अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. पिकावर अळींचे शेतकºयांनी तक्रार अर्ज करावा. पाहणी करुन भरपाई देण्याविषयी विचार होईल. केलवड गावासह इतरही गावांतील शेतक-यांची ही परिस्थिती असेल तर पीकविमा व इतर मदत मिळाली पाहिजे, असे कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले. पावसाचे कमी प्रमाण व फसवी बियाणे असल्याने सोयाबीन पिकात रोटाव्हेटर मारण्याची वेळ आली. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकरी नानासाहेब फटांगरे यांनी सांगितले.