रुईछत्तीसी शाळेला पाच वर्ग खोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:56+5:302021-05-09T04:21:56+5:30
रूईछत्तीसी : नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच वर्ग खोल्यांसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ...
रूईछत्तीसी : नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच वर्ग खोल्यांसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ४३ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
येथील वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून लक्ष वेधण्यात आले होते. परंतु, तालुक्यातील बऱ्याच शाळांच्या खोल्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत प्रस्तावित होत्या. त्यामुळे रूईछत्तीसी येथील वर्गखोल्यांचा विषय थोडा मागे पडला होता. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गोरे यांच्या वतीने शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनी पाच वर्गखोल्यांसाठी ४३ लाख रूपयांचा निधी मंजूर केला. या आशयाचे पत्र प्रवीण गोरे यांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून देण्यात आले आहे. यासाठी प्रहार जिल्हा प्रमुख विनोद परदेशी, प्रवीण पिंपळे, दीपक गोरे, संजय गोरे यांचे सहकार्य लाभले.