बिबट्याची अफवा, प्रत्यक्षात निघाले तरस
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:52+5:302020-12-08T04:17:52+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहर परिसरात बिबट्या आल्याची अफवा जोरात पसरली. मात्र, तरसाच्या पावलांचे ठसे निघाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहर परिसरात बिबट्या आल्याची अफवा जोरात पसरली. मात्र, तरसाच्या पावलांचे ठसे निघाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
शेजारच्या आष्टी, करमाळा, कर्जत, जामखेड तालुक्यांत बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे श्रीगोंदेकरांचीही पाचावर धारण बसली आहे.
शहरामधील मांडवगण रस्ता, कुकडी ११ नंबर चारी परिसरत बिबट्या आला, असे या परिसरातील काही नागरिकांचे म्हणणे हाेते. तशा तक्रारीही होत होत्या. त्यामुळे सोमवारी वन विभागाचे कर्मचारी विठ्ठल घालमे, संभाजी शिंदे यांनी त्या भागाता जाऊन पाहणी केली. तेथे असलेले ठसे हे बिबट्याचे नसून तरसाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मात्र, रात्री हातात बॅटरी, काठी घेऊन बाहेर पडावे, शेळ्यांना गोठ्यात बांधावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे, त्यांना एकटे सोडू नये, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ‘प्रहार’चे नितीन रोही, डॉ. विलास आळेकर, संदीप आळेकर, पोपट आळेकर, नितीन दांडेकर उपस्थित होते.