साध्वी अमृतकंवरजी यांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:33+5:302021-08-24T04:25:33+5:30
श्रीरामपूर : श्रमण संघाच्या साध्वी अमृतकंवरजी यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन धर्म संस्कृतीचा प्रचार केला. त्यांनी आपली ...
श्रीरामपूर : श्रमण संघाच्या साध्वी अमृतकंवरजी यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन धर्म संस्कृतीचा प्रचार केला. त्यांनी आपली इहलोक यात्रा श्रीरामपूर येथे संपवली. जैन समाजाने त्यांचे विचाराचे व उपदेशाचे पालन करून समाजामध्ये संघटन शक्ती दृढ करावी, असा उपदेश पद्मऋषीजी यांनी दिला.
अमृतकंवरजी यांचा स्मृतिदिनी जैन स्थानकामध्ये नवकार महामंत्र जाप व आयंबिल व सामाईक तप करण्यात आले. त्यावेळी पद्मऋषीजी व अचलऋषीजी महाराज यांचे प्रवचन झाले. पद्मऋषीजी यावेळी म्हणाले, मृतकंवरजी यांनी जीवनात संयम व तपाचे पालन केले. स्थानकामध्ये जैन पाठशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना धार्मिक शिक्षणासाठी पाठवावे, प्रवृत्त करावे. लहानपणी धर्मसंस्कार घडतात ते मोठेपणी कामी येतात. त्यामुळे प्रगती होेते. लहानपणी संस्काराची शिदोरी घेऊन जीवन सुखी व आनंदी करा. संस्कार हे जीवनात धर्म व गुरुंबद्दल आदराची भावना शिकवतात. डॉ. अचलऋषी यांनी लहान बालकांना भगवान महावीर व जैन धर्म संस्कृतीची ओळख होण्यासाठी जैन पाठशाळेत शिक्षण देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रवीण चंगेडिया यांनी स्तवन म्हटले. जैन श्रावक संघाने भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
---------------