‘साई ब्रह्मनाद’ची मलेशियात भजनसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:19 PM2017-09-04T15:19:26+5:302017-09-04T15:19:44+5:30
साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियातील २६ साईबाबा सेवा केंद्रांमध्ये साई भजनांच्या सादरीकरणासाठी श्री शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे एस. पी. कन्नन यांनी निमंत्रित केले आहे.
ल कमत न्यूज नेटवर्ककोपरगाव : येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियातील २६ साईबाबा सेवा केंद्रांमध्ये साई भजनांच्या सादरीकरणासाठी श्री शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे एस. पी. कन्नन यांनी निमंत्रित केले आहे.५ ते १६ सप्टेंबर या काळात मलेशियात नवरात्रोत्सवाप्रमाणे ९ दिवसांचा साई उत्सव साजरा होत आहे. मलेशियातील सेलंगोर, क्रिया बाबाजी आश्रम क्लग, लेबह आम्पांग, क्वालालम्पूर, ब्रीकफिल्ड, जोहोरबारू, रवांग, मेलाका, कुलीम, पुचोंग, सेरेमबन, पिनंग, सुंगाईपेटानी, जॉर्जटाउन व इपोह आदी साई सेवा केंद्रांमध्ये स्वरमंचाचे साई भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. साई समाधी शताब्दीनिमित मलेशियन साई भक्तांना शिर्डीत येण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे स्वरमंचाचे संस्थापक प्रा.रवींद्र पिंगळे यांनी सांगितले. नावाजलेल्या कलाकारांना निमंत्रीत करून विविध देशातील संस्कृतींचे आदान-प्रदान होते. शेवटच्या दिवशी साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होते. पिंगळे यांच्या समवेत संकेत दरकदार, नकुल भगत, संतोष शेलार,पंकज पाखले, पराग पाखले, निलिमा खानापुरे व राजश्री पिंगळे हे कलाकार मलेशियाला रवाना झाले आहेत.