साईसंस्थानचा कारभार जावयाच्या हाती; बाबासाहेब घोरपडे प्रभारी सीईओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:38 AM2020-07-29T11:38:11+5:302020-07-29T11:38:58+5:30
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाली आहे. यामुळे संस्थानचा प्रभारी कार्यभार बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. घोरपडे हे शिर्डीचे जावई आहेत. तर राहाता तालुक्याचेच रहिवासी आहेत.
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाली आहे. यामुळे संस्थानचा प्रभारी कार्यभार बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. घोरपडे हे शिर्डीचे जावई आहेत. तर राहाता तालुक्याचेच रहिवासी आहेत.
आयएएस केडरचे अरुण डोंगरे यांची नुकतीच बदली झाल्याने साईसंस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब बाळकृष्ण घोरपडे (वय ४८) यांच्याकडे डोंगरे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे़ घोरपडे हे शिर्डीत सातभाई मळ्यात राहणाºया रामदास मारूती कोते यांचे जावई आहेत. तर येथून दहा किलोमीटर अंतरावरील पिंप्री निर्मळचे रहिवासी आहेत़ साईसंस्थानच्या सर्वोच्च प्रशासकीय पदी काम करण्याची संधी प्रथमच एका स्थानिकाला संधी मिळाली आहे़
गेल्या चार वर्षापासून संस्थानचे मुख्य लेखाधिकारी पदावर घोरपडे हे काम करीत होते. त्यांनी यापूर्वी उपकार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे़ त्यानंतर त्यांच्याकडे उपमुख्य कार्यकारीपदाचीही जबाबदारी होती़
घोरपडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १९९९ बॅचचे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेचे अधिकारी आहेत़ सध्या ते शासन सेवेकडून प्रतिनियुक्तीवर साईबाबा संस्थानकडे आहेत़